पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक; साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना चंदनननगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पिस्तूलासह 5 जिंवत काडतुसे आणि मोटार असा एकूण 10 लाख 41 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बजरंग विठ्ठल शिरगे (वय 20, रा. वडगाव शेरी ) आणि रणजित रामचंद्र लोंढे (वय 38, रा. खराडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पिस्तूल बाळगणारे दोघे खराडीतील तुकारामनगरमध्ये मोटारीत बसल्याची माहिती पोलीस हवालदार श्रीकांत गांगुर्डे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्याकडे पिस्तूल आणि 5 काडतुसे आढळली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अब्दुल करीम सय्यद, युसूफ पठाण, श्रीकांत गांगुर्डे, महेश नाणेकर, अमित कांबळे, नामदेव गडदरे यांच्या पथकाने केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन आरमळ अधिक तपास करीत आहेत.