
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
तालुक्यातील चासनळी शिवारात व गोदावरी पात्रात अशा दोन ठिकाणी हातभट्टी लावून गावठी दारु तयार करताना पोलिसांनी दोन लाखांचे कच्चे रसायन व साहित्य जप्त केले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवार्इ मंगळवारी सकाळी 7 वाजता करण्यात आली. कोपरगाव ग्रामीण पोलिसांना चासनळी परिसरात बेकायदेशीर गावठी दारु तयार करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. सी. एम. तोर्वेकर व पो. हे. कॉ. पी. बी. काशीद फौजफाट्यांसह चासनळी शिवारात व गोदावरी पात्रातजावून धडकले. त्याठिकाणी शिवाजी संपत माळी ( 35) व कृष्णा सुर्यभान दळे (52 दोघे रा.मानकेश्वर नगर, चासनळी) यांना वेगवेगळया ठिकाणी हातभट्टीची दारु तयार करीत असताना रंगेहात पकडण्यात आले. यावेळी अन्य आरोपी फरार झाले. या कारवार्इत 1 लाख 3 हजार 500 व 92 हजार 500 चे कच्चे रसायन,दारु बनविण्याचे साहित्य तसेच तयार दारु जप्त करण्यात आली.






















































