
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रस्तात लूट करणाऱ्या दोन गुन्हेगारांना 24 तासांमध्ये अटक केली आहे. आरोपीमध्ये संग्राम रमेश गिते (वय 29, रा.शिवाजी नगर, केडगाव,नगर), सौरभ जगदीश खंडेलवाल ( वय 19, रा.मोहिनीनगर, केडगाव, नगर) या दोघांचा समावेश आहे.
तक्रारदार वैभव प्रमोद झाडे (वय 20) नगर रेल्वे स्थानकात उतरुन माळीवाडा, बसस्टॅण्डकडे चालत येत असताना दोन व्यक्तींनी मोटारसायकलवर येत त्यांना मारहाण केली. त्यांच्या पाठीवरील बॅग बळजबरीने हिसकावली. त्यातील रोख रक्कम आणि 5 हजाराचा मोबाईल असा मुदेदमाल लुटून नेला होता. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करुन दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, पोलीस नायक रविंद्र क्डील, दिपक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल मेघराज कोल्हे, विनोद मासाळाकर, योगेश सातपुते, मयुर गायकवाड, राहुल सोळुंके यांच्या पथकाने केली आहे.

























































