पुणे शहरात दोन ठिकाणी घरफोडी; अडीच लाखांचा ऐवज चोरीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील आंबेगाव खुर्द व मंतरवाडी परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू व रोकड असा एकूण 2 लाख 54 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी भारती विद्यापीठ व लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंबेगाव खुर्द येथील साईश्रद्धा निवास सिद्धीविनायक कॉलनीत चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व इलेक्ट्रॉनिक वस्तू असा 2 लाख 54 हजाराचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी रवी देवजी चव्हाण (वय 35) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दिली आहे. रवी 18 मार्चला हैद्राबाद येथे गेले होते. त्यामुळे त्यांचे राहते घर बंद होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांचा मुख्य दरवाज्याचा कडी कोयंडा उचकटून चोरी केली. दरवाजा उघडा दिसल्यानंतर शेजारच्यांनी चव्हाण यांना फोनद्वारे दिली होती. हैद्राबाद येथून आल्यानंतर त्यांनी घराची पहाणी केली असता चोरी झाल्याचे समजले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही.ऐ म्हेत्रे करीत आहेत.

मंतरवाडीतील सवाई गोल्ड सोसायटी कचरा डेपोजवळ असलेल्या इमारतीतून चोरट्यांनी 50 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सोमनाथ बबन यादव (वय 38) यांनी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सोमनाथ त्याच्या आईकडे राहण्यास गेले होते. त्यावेळी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 25 हजार रुपये किंमतीचा टीव्ही आणि 25 हजाराची रोकड असा 50 हजाराचा ऐवज चोरी केला. याप्रकणी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर तपास करीत आहेत.