कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिणी बुडाल्या; एकीचा मृत्यू

606

चिपळूण तालुक्यातील निरबाडे येथे दगडाच्या खाणीत आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिणी बुधवारी दुपारी खाणीतील पाण्यात बुडाल्या. या दुर्दैवी घटनेत लहान बहिणीचा बुडून मृत्यू झाला. तर एकीला वाचवण्यात यश आले असून तिला चिपळुणातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आधी 5 बहिणी बुडाल्या नंतर 4 भाऊ बुडाले, एका दिवसांत 9 जणांचा बुडून मृत्यू

निरबाडे मोहल्ला येथे राहणाऱ्या नजराना अहमद शेख (वय-9) आणि अरजीना अहमद शेख (वय-11) या दोघी बहिणी आपल्या आईबरोबर दुपारी बारा वाजता जवळच्या दगडाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. या वेळी नजराना हिचा पाय घसरून ती पाण्यात पडल्यानंतर तीने वाचविण्यासाठी आरडाओरडा केला. बहिण बुडत असल्याचे पाहून तिला वाचवण्यासाठी अरजीना धावली मात्र दोन्ही बुडू लागल्या. नंतर आईने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी जवळचे ग्रामस्थ धावून आले आणि त्यांनी त्या दोघींना पाण्यातून बाहेर काढले त्यांना तात्काळ चिपळूण शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र दाखल करण्यापूर्वीच नजराना हिचा मृत्यू झाला. तर अरजीनावर उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या