नागपाड्यात बस स्टॉपला तरुणाची गळफास घेऊन तर जोगेश्वरीत नोकराची उडी मारून आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
death

नागपाडा आणि जोगेश्वरी येथे आज आत्महत्येच्या घटना घडल्या. नागपाडा येथे एका अज्ञात तरुणाने बस स्टॉपलाच ओढणीने गळफास लावून घेतला.

मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला किसन बाबू हा जोगेश्वरी येथील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या व्यावसायिकाच्या घरी गेल्या साडेचार वर्षांपासून घरकामाला होता. लॉकडाऊनमुळे लग्न पुढे ढकलल्याने तो नैराश्यात होता. शनिवारी मालकाला न सांगता किसन घरातून निघून गेला. मालकाने त्याचा शोध घेतला. रविवारी सकाळी तो पुन्हा घरी आला. मालकाने त्याला अंबोली पोलीस ठाण्यात नेले. तेथे पोलिसांनी त्याचे समुपदेशन केले. किसन मालकासोबत घरी आला. मालक आंघोळ करण्यासाठी गेले असता किसनने 22 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

दरम्यान, नागपाड्यातील बेलासीस रोडवर असलेल्या बस स्टॉपवर अंदाजे 45 वयाच्या इसमाने लोखंडी रॉडला ओढणीने बांधून गळफास घेतला. त्याला सर जे. जे. रुग्णालय येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.