जम्मू-कश्मीरच्या सोपोरमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमध्ये सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरोधातील ऑपरेशन ऑल आऊटला वेग दिला आहे. सोपरच्या हार्डशिवा गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. हार्डशिवा गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने शोध मोहिम हाती घेतली. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना घेराव घातल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली.

हार्डशिवा गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सीआरपीएफ, लष्कर आणि जम्मू कश्मीर पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे शोधमोहिम हाती घेतली. दहशतवादी लपलेल्या ठिकाणी सुरक्षा दलाने घेराव घातला असता, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. य ठिकाणी आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता असून अजूनही चकमक सुरू आहे.

दहशतवादी घातपाताचा कट रचत असून आयईडी स्फोटकांद्वारे ते सुरक्षा दलाला लक्ष्य करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुप्तचर यंत्रणानीही सुरक्षा दलाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेला गती देण्यात आली असून त्यात सुरक्षा दलाला यश मिळत आहे.