
सामना ऑनलाईन । कुपवाड
जम्मू कश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहे. हंदवाडामध्ये दोन ते तीन दहशतवादी लपल्याची खबर सुरक्षा दलाला मिळाली होती. रात्री 9 वाजता सुरक्षा दलाने शोधमोहीम हाती घेतल्यानंतर पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी क्रालगुंडमधील एका इमारतीतून दहशतवाद्यांनी गोळीबारास सुरूवात केली. या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले.
हिंदुस्थान पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असतानाही पाकड्यांनी पुन्हा गुरूवारी रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. उरी भागात पाकिस्ताने गवाहालन, चोकस, किकेर, कथी पोस्ट, राजौरी आणि पुंछ मध्ये गोळीबार केला. या गोळीबार एका महिलेचा मृत्यू झाला असून एक जवान जखमी झाला आहे. सेनेच्या अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने सलग सातव्या दिवशी गोळीबार केला आहे. तसेच त्यांनी हिंदुस्थानी चौक्यांना लक्ष्य केले आहे.





























































