
वाघांच्या जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपुरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाघाच्या दोन बछड्यांचा मृतदेह आढळून आला. तर अशक्त बछड्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना जिल्ह्यातील बल्लारपूर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कळमना उपक्षेत्रातील कक्ष क्रमांक 572 मध्ये गुरुवारी उघडकीस आली. या घटनेने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. दोन बछड्यांचा मृत्यू उपासमारीमुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तवला आहे. हे तिन्ही बछडे आईपासून वेगळे झाले असावे, असाही तर्कही वर्तवण्यात येत आहे.
बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कळमणा उपक्षेत्रात वन कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना कळमणा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 572 मध्ये एक अशक्त वाघाचा बछडा दिसून आला. वनविभागाने त्याला तात्काळ रेसक्यु केले. उपचारा करीता बछडयाला वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर येथे हळविण्यात आले.कैद केलेला बछडा ही मादी असून तिचे वय अंदाजे 5 महिने असल्याचे वन विभागाने सांगितले. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली तिला ठेवण्यात आले आहे.
त्याच परिसरात इरतत्र ठिकाणी दोन वाघाचे बछडे मृतावस्थेत आढळुन आले आहेतत. वन विभागाने पंचनामा करून वन्यप्राणी (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये प्राथमीक वनगुन्हा क्रमांक 08945/223615/2023 नोंदविला आहे. दोन्ही मृत वाघाचे बछड्यांचे शव ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर येथे नेण्यात आले. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्युचे कारण सांगता येईल, असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, त्यांचा मृत्यू उपासमारीने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.


























































