
सामना ऑनलाईन, शबरीमाला
महिलांना ‘प्रवेशबंदी’ असलेली केरळमधील शबरीमाला मंदिराची शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढून दोन महिलांनी आज पहाटे त्या मंदिरात घुसून दर्शनाचा आपला हक्क बजावला. त्या महिलांनी भगवान अय्यप्पा यांचे दर्शन घेण्याच्या केलेल्या क्रांतिकारक कामगिरीमुळे नवा इतिहास घडला आहे. दोन महिलांनी शबरीमाला मंदिरात प्रवेश केल्याचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी अधिकृतरीत्या जाहीर केले. मात्र भगवान अय्यप्पा यांचे दर्शन त्या महिलांनी घेतल्यानंतर मुख्य पुजाऱ्याने गाभारा बंद करून शुद्धीकरणाचा विधी पार पाडला.
महिलांना ‘प्रवेशबंदी’ असलेली केरळमधील शबरीमाला मंदिराची शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढून दोन महिलांनी आज पहाटे त्या मंदिरात घुसून दर्शनाचा आपला हक्क बजावला. त्या महिलांनी भगवान अय्यप्पा यांचे दर्शन घेण्याच्या केलेल्या क्रांतिकारक कामगिरीमुळे नवा इतिहास घडला आहे. दोन महिलांनी शबरीमाला मंदिरात प्रवेश केल्याचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी अधिकृतरीत्या जाहीर केले. मात्र भगवान अय्यप्पा यांचे दर्शन त्या महिलांनी घेतल्यानंतर मुख्य पुजाऱयाने गाभारा बंद करून शुद्धीकरणाचा विधी पार पाडला.
शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याची मागणी धसास लावण्यासाठी मंगळवारी डावी लोकशाही आघाडी सरकारने मंगळवारी 620 किलो मीटरची ‘मानवी साखळी’ तयार केली होती. त्याच्या दुसऱयाच दिवशी दोन महिलांनी शबरीमाला मंदिरात घुसून दर्शनाचा हक्क प्रस्थापित केला.
10 ते 50 या वयोगटातील महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेशाला मुभा देणारा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 28 सप्टेंबर रोजी दिला होता. पण भाजप आणि काँग्रेससहित हिंदुत्वावादी संघटनांनी आणि भगवान अय्यप्पा यांच्या भक्तांनी शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यास कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होऊ शकली नाही.
भक्तांकडून होणाऱ्या विरोधानंतरही काही महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याचे प्रयत्न केले होते. पण भक्तांच्या प्रतिआंदोलनामुळे महिलांना पोलीस बंदोबस्तातही मंदिरात प्रवेश करणे आणि दर्शन घेणे शक्य झाले नव्हते. मात्र मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डावी लोकशाही आघाडीच्या मुख्यमंत्री पी. विजयन यांचे सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या महिलांना प्रवेश खुला करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यावर ठाम होते.
दर्शन घेणाऱया महिलांनी काळय़ा रंगाचा पेहराव केल होता. डोके झाकलेले होते. दर्शन घेतल्यानंतर त्या दोघी कुठे गेल्या, याची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. तसेच त्यांच्या घरांना पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे.
राज्यात हाय अॅलर्ट
दर्शन घेतल्याचे वृत्त येताच केरळात काही भागात तणाव निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर राज्यात हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
शुद्धीकरणासाठी भक्तांना बाहेर काढले
पहाटे तीन वाजता खुले होणारे शबरीमाला मंदिर एरवी दुपारी 12.30 वाजता बंद होते. पण दोन महिलांचे प्रवेशनाटय़ घडल्यानंतर ते मंदिर आज शुद्धीकरण विधीसाठी सकाळी 10.30 वाजताच बंद करण्यात आले होते. शुद्धीकरणा वेळी भक्तांना मंदिरातून बाहेर जाण्यास सांगण्यात आले होते.
पोलिसांनीच व्हायरल केला व्हिडीओ
दोन महिलांच्या शबरीमालातील प्रवेशाचा व्हिडीओ केरळ पोलिसांनीच व्हायरल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णवाहिकेतून बिंदू व कनकदुर्गा या मंदिर परिसरात आल्या. पोलिसांनी त्यांच्या मंदिर प्रवेशाची तयारी अगोदरच केली होती. त्यानुसार त्या मंदिरात गेल्या. दर्शन घेऊन परत आल्यानंतर या दोघींना कडक सुरक्षेत पाठवण्यात आले.
भाजपचे निषेध आंदोलन
शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाला विरोध करण्यासाठी भाजपने आणि भाजप युवा मोर्चाने आज येथे निषेध मोर्चा काढत आंदोलन केले.
शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून निर्माण झालेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा केरळ सरकारचे अपयश आहे. हिंदूंवर दिवसाढवळय़ा झालेला हा बलात्कारच आहे- अनंतकुमार हेगडे, केंद्रीय मंत्री
शबरीमाला मंदिरात प्रवेश करून दोन महिलांनी भगवान अय्यप्पा यांचे दर्शन घेण्याची केलेली कामगिरी हा समतेचा विजय आहे. आमच्या चळवळीचा विजय आहे-तृप्ती देसाई, नेत्या भूमाता ब्रिगेड


























































