दुर्देवी! आजीच्या दशक्रियाविधीसाठी नदीत आंघोळीला उतरलेल्या दोन भावंडांचा बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sunk_drawn

आजीच्या दशक्रिया विधीसाठी नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या दोन भावांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात खानापूर गवळी गावात घडली. या घटनेमुळे संपूर्ण खानापूर गावावर शोककळा पसरली आहे.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खानापूर गवळी येथे साखळी धरणाच्या खाली नदी वाहते. त्या नदीत या भावंडांचा मृत्यू झाला आहे. मनीष दिलीपराव टोमपे (23) व ईश्वर रामरावजी टोमपे (25) अशी मृत भावंडांची नावे आहेत. दहा दिवसांपूर्वी त्यांची आजी ममताबाई टोमपे (75) यांचं निधन झाले होते. तिच्या दशक्रिया विधीसाठी नदीकाठी असलेल्या ऋषी महाराज मंदिरात कुटूंबातील सर्व व्यक्ती हजर होत्या.

विधी आटोपल्यानंतर मनिष आणि ईश्वर दोघं भाऊ आंघोळीसाठी नदीत उतरले. मात्र दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने नियंत्रण सुटले आणि ते वाहत भाोवऱ्यातून मोठ्या पाईप मध्ये अडकले. दोघांना वाचवण्यासाठी नातेवाईकांनी नदीत उड्या घेतल्या. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.