श्रीरामपुरात दोन तरुणांची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीरामपूर परिसरामध्ये दोन तरुणांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. तरुणांनी आत्महत्या का केली, हे अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर एक भागातील नेनो रो हाउसिंग सोसायटी परिसरात राहणारे किरण नंदकुमार कटके (वय 27) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. तर दुसर्‍या घटनेत अरविंद मोतीलाल यादव (वय 25 ,रा. फुले आंबेडकर नगर ,दत्तनगर ,श्रीरामपूर) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या दोन्ही तरुणांना उपचारासाठी कामगार रुग्णालय आणले असता डॉक्टरांनी दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक पवार व पोलीस नाईक शेलार करीत आहेत.