
पेणच्या गणपतीवाडीजवळील एसटी बस थांब्याजवळ दुचाकीचा बुधवारी रात्री भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. नीलेश पाटील आणि वरद सुतार अशी मृत तरुणांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नदीमाळ येथे राहणारा नीलेश पाटील हा वरद सुतारसह दुचाकीवरून पेण-खोपोली महामार्गावरून जात होता. ते गणपतीवाडीजवळ आला असता हा अपघात झाला. दोघेही रस्त्याच्या कडेला कोसळले. अपघाताची माहिती मिळताच पेण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या तरुणांना उपचारासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हा अपघात कसा झाला याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या अपघाताची नोंद पेण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.




























































