अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीचे काम लवकर पूर्ण करा; उदय सामंत यांचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरीतील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच महाविद्यालयाच्या आवारातील रस्ते व अन्य सुशोभिकरणाचे काम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल्या. उदय सामंत यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आढावा घेतला. त्याप्रसंगी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे नव्याने सुरु झालेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पदवी, पदविका व औषधनिर्माण शास्त्र या विभागांची माहिती घेतली. बैठकीला शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य ए. एम. जाधव, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. खंते, शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य आर. पी. मराठे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, वीणा पुजारी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे उपस्थित होते.

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच महाविद्यालयाच्या आवारातील रस्ते व अन्य सुशोभिकरणाचे काम तात्काळ पूर्ण करण्याचा सूचना या बैठकीत उदय सामंत यांनी दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. खंते यांनी महाविद्यालयातील अध्यापनाचे कामकाज, विषय, विद्यार्थीसंख्या प्रवेशप्रक्रिया, शिक्षक, अद्यावत वाचनालय, संगणक कक्ष याबाबत उदय सामंत न्यांना माहिती दिली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात उदय सामंत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.