महामार्ग रुंदीकरण रखडलेल्या राजापूर- लांजातील कामांना गती द्या, उदय सामंत यांच्या सूचना

मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणातील लांजा तालुक्यातील 18 प्रलंबित भूसंपादन प्रकरणे लवकर निकाली काढण्यासोबतच 8 प्रकरणी निवाडे देवून थांबलेले काम सुरु करा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका बैठकीत ते बोलत होते.

सिंधुदूर्ग जिल्हयात महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले मात्र रत्नागिरी जिल्ह्यात काम 2018 पासून रखडल्याबाबत तसेच या महत्वाच्या विषयात प्रांत अधिकारी खाडे यांनी बैठकीस उपस्थित न राहिल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. लांजा शहराला होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे काम महामार्ग उभारणीमुळे नव्याने करावे लागणार आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणान 1 कोटी 70 लाख रुपयांचा निधी दिला आहे. पुढील 15 वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन येथील जलवाहिनी 80 मिमी ऐवजी आता 100 मिमी व्यासाची असेल अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

यावेळी राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी, रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे लांजाचे नगराध्यक्ष मनोहर बाईत व इतर उपस्थिती होते.

आपली प्रतिक्रिया द्या