आघाडी सरकारने जनतेची फसवणूक केली – उदयनराजे भोसले

1167

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी परळीत विरोधकांवर टीका केली. आपण शरद पवारांना धोका दिला नाही, मी जनतेशी बांधील आहे, असे सांगत त्यांनी आघाडीवर निशाणा साधला. आघाडी सरकारने जनतेची फसवणूकच केली आहे, जनतेची सेवा करण्यासाठी मनापासून कळकळ पाहिजे आणि ती त्यांच्याकडे नाही अशी टीका त्यांनी केली. आघाडी सरकारने मराठा आरक्षणही दिले नाही. ते महायुतीच्या सरकारने दिले. आघाडी सरकारने सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याऐवजी सत्तेच केंद्रीकरण करत व्यक्तिकेंद्रीत राजकारण करण्याचं काम केलं. नरेंद्र मोदी देशाचे आयर्न मॅन आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होत असल्याचेही ते म्हणाले.

पंकजा मुंडे यांना निवडून द्या, त्या गोपीनाथ मुंडे यांचे कार्य पुढे नेत आहेत, त्यांना साथ द्या असे आवाहन उदयनराजे यांनी केले. बहिणीला त्रास झालेले मला चालणार नाही. मी पंकजा यांचा भाऊ म्हणूण नेहमीच त्यांच्या पाठीशी उभा आहे, असे ते म्हणाले. ‘एक बार मैने कमीटमेंट कर दी, तो मै खुदकी भी नही सूनता’ असा डायलॉगही त्यांनी मारला. मी तरुण आहे, तुम्हीही तरुणच आहात असे म्हणत त्यांनी उपस्थितांना हसवले. मला घाई असल्याने लवकर जावे लागत आहे. मात्र, मी पंकजाताईच्या विजयी सभेला परळीत येणार असल्याचे ते म्हणाले. गणेशपार येथील महायुतीच्या सभेआधी उदयनराजे भोसले यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले,यावेळी खासदार प्रितम मुंडे उपस्थित होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या