
राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या तोफा आता सर्वत्र धडाडणार आहेत. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शिवसेनेने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह 40 जणांच्या नावाची घोषणा शिवसेनेने आज केली.
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेच्या 40 स्टार प्रचारकांची यादी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते–युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, शिवसेना नेते अनंत गीते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, राजन विचारे, आमदार अॅड. अनिल परब, सुनील प्रभू, अबांदास दानवे यांचा समावेश आहे.
याशिवाय शिवसेना सचिव आदेश बांदेकर, आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत, नितीन बानुगडे-पाटील, राजकुमार बाफना, खासदार प्रियांका चतुर्वेदी, ओमराजे निंबाळकर, संजय (बंडू) जाधव, आमदार सचिन अहिर, सुनील शिंदे, मनोज जामसुतकर, नितीन देशमुख, सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, जयश्री शेळके, जान्हवी सावंत, शरद कोळी, वैभव नाईक, आनंद दुबे, किरण माने, अशोक तिवारी, प्रियांका जोशी, सचिन साठे, लक्ष्मण वडले यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 864 रहिवाशांना काही दिवसांतच घराच्या चाव्या देण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने आता संपुलाच्या सुशोभीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. नायगावमधील या संपुलाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संपुल’ असे नामकरण करण्यात आले आहे. पुनर्विकासामुळे वर्षानुवर्षे 160 चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱया बीडीडीवासीयांचे 500 चौरस फुटांच्या प्रशस्त घरात राहण्याचे स्वप्न साकार होणार आहे. महाविकास आघाडीच्या काळात बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात झाली होती.





























































