विमानतळ ते ब्ल्यू सी व्हाया मातोश्री!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आज झालेल्या भेटीकडे संपर्ण देशातील प्रसिद्धीमाध्यमांचे लक्ष लागले होते. मुंबई विमानतळावर उतरल्यावर अमित शहांचे थेट सोफिटेल हॉटेलवर आगमन झाल्यावर भाजप कोअर कमिटीची बैठक सुरू झाली. या बैठकीत शिवसेना-भाजप युतीवर चर्चा करताना अमित शहा यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर मातोश्रीवरील बैठक आटोपून अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी एकाच मोटारीतून वरळीपर्यंत प्रवास केला.

घटनाक्रम

  • अमित शहा यांचे मुंबई विमानतळावर संध्याकाळी आगमन.
  • संध्याकाळी भाजप कोअर कमिटीसोबत हॉटेल सोफिटेल येथे बैठक.
  • संध्याकाळी 6.40 वाजता अमित शहा यांचे मातोश्रीवर आगमन.
  • अमित शहा यांच्या मोटारीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे.
  • पीयूष गोयल मागील मोटारीत.
  • मातोश्रीच्या पहिल्या मजल्यावर बैठक.
  • उद्धव ठाकरे, अमित शहा, देवेंद्र फडणवीस व आदित्य ठाकरे यांच्यात युतीबाबत चर्चा.
  • सध्यांकाळी 7.35च्या सुमारास अमित शहा, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस व आदित्य ठाकरे मातोश्रीवरून एकाच मोटारीतून वरळीच्या ब्ल्यू सी हॉटेलकडे रवाना.
  • ब्ल्यू सी हॉटेलमध्ये 7.45च्या सुमारास आगमन.
  • उद्धव ठाकरे, अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांची संयुक्त पत्रकार परिषद.

‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते मनोहर जोशी, ऍड. लीलाधर डाके, खासदार गजानन कीर्तिकर, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते.