पाऊसपाण्यात-चिखलात संघर्ष करणाऱ्या मराठी बांधवांना सुविधा पुरविण्यासाठी कंबर कसा! उद्धव ठाकरे यांचे तमाम शिवसैनिकांना आवाहन

आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपला मराठी बांधव मुंबईत एकवटला आहे. ही संख्या हजारोंच्या घरात आहे. पाऊसपाणी-चिखलात तो आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करीत आहे. सरकार त्यांना सुविधा पुरवण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे पाऊसपाण्यात, चिखलात संघर्ष करणाऱया मराठा बांधवांना सुविधा पुरवण्यासाठी कंबर कसा, असे आवाहन आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.

मुंबईत आलेल्या हजारो मराठा बांधवांना सरकारकडून पुरेशा सुविधा मिळत नसल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे मराठा बांधवांना आवश्यक असलेल्या पाणी, अन्न, शौचालये अशा सुविधा पुरवाव्यात. हाच आपला मराठा धर्म आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.