
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप अशा विविध उपक्रमांचे मुंबईसह राज्यभरात आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांचा या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ग्राहक कक्ष, शीव विधानसभेच्या वतीने पालिकेच्या वडाळा येथील अॅकवर्थ लेप्रसी रुग्णालयात रुग्णांना जेवण, फळवाटप करण्यात आले. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख प्रमोद शिंदे, विधानसभाप्रमुख गोपाळ शेलार, ग्राहक संरक्षण कक्षाचे सचिव, उपविभागप्रमुख राजेश कुचिक, निरीक्षक शिवाजी गावडे, संघटक गजानन पाटील, आनंद जाधव, सुहासिनी ठाकूर, सुशीला गाडे, रणजित चोगले, एकनाथ पवार, संजय कदम, सचिन खेडेकर, प्रकाश हसबे, समाधान जुगदर, उपकार खोत, माधुरी ढोके, सुचिता कोळंबेकर, दीक्षा गुंजाळ, महेंद्र बिरवटकर, अशोक वडगावकर, सचिन साठे, गणेश भोईर, भोकटे उपस्थित होते. हा कार्यक्रम कक्ष संघटक सुशील सुंकी यांनी आयोजित केला होता.
शिवसेना विभाग क्र. 1 च्या विभाग संघटक शुभदा शिंदे यांच्या आयोजनाखाली शाखा क्र. 12 मागाठाणे येथे महिलांसाठी आरोग्य शिबीर, गर्भाशय चाचणी शिबीर उपक्रम झाला. शिव आरोग्य सेनेचे याकरिता विशेष सहकार्य लाभले. यावेळी विभाग संघटक शुभदा शिंदे, विधानसभाप्रमुख अशोक म्हामूनकर, विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, विधानसभा समन्वयक तुकाराम पालव, उपविधानसभा समन्वयक सारिका झोरे, शाखा संघटक गायत्री शाह, शाखा समन्वयक इतिश्री महाडिक, नीता नाईक, सीमा सानप आदी उपस्थित होते.
साई सिद्धी संस्थेच्या वतीने माजी शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे व संतोष देवरुखकर, अजय काwसाले, संदीप पाटील यांच्या नियोजनाने भवानी शंकर रोड महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विभागप्रमुख-आमदार महेश सावंत, निरीक्षक यशवंत विचले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
युवासेना उपसचिव व युवा व्हिजन अध्यक्ष प्रथमेश सकपाळ यांच्या वतीने व सहेली जायंट ग्रुप चौपाटी व जायंट ग्रुप चौपाटी यांच्या सहकार्याने पालिका सफाई कर्मचाऱयांना पावसापासून संरक्षण करण्यासाठी रेनकोटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला सफाई कर्मचाऱयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सहेली ग्रुपचे अश्विनी शहा, दक्षा शाह, हर्षा शहा, जायंट ग्रुपचे संजय मेहता, श्रेणिक, युवासेना उपविभाग अधिकारी मिलिंद झोरे, वरुण खुळे, नीलेश परमार उपस्थित होते.
शिवसेना परळ शाखा क्र. 203 च्या सहकार्याने लालबाग-परळ विभागात कापडी पिशवी घराघरांत या पर्यावरणपूरक उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमाचा शुभारंभ शिवडीचे आमदार अजय चौधरी यांच्या हस्ते झाला. यावेळी युवासेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य सिद्धेश धाऊसकर, मिनार नाताळकर, भारती पेडणेकर, रमेश सावंत, प्रभाकर मोरजकर, सुरेश चाचे, प्रदीप वाटाणे, प्रथमेश जगताप, सागर कुडतरकर, प्रमोद मुळदेकर उपस्थित होते.