उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरात विद्यार्थ्यांचा गुणगौरव, वह्यावाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजन आणि धार्मिक पर्यटन, वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना भरघोस प्रतिसाद मिळाला.

Displaying ramadham-vaibhav.jpg

शिवसेना नेते, विभागप्रमुख अॅड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा क्र. 95 महिला आघाडीच्या वतीने खोपोली येथील रमाधाम वृद्धाश्रमात वृद्धांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याचबरोबर वृद्धांसाठी धार्मिक स्थळांना भेटीचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रमुख आयोजक चंद्रशेखर वायंगणकर, वेदिका वायंगणकर, अलका साटम, वसंत गावडे, सुषमा गवस उपस्थित होते.

Displaying lalbag27 - vaibhav.jpg

सुभाष डामरे मित्र मंडळ व शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने दहावी-बारावीमधील 110 विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ शिवसेना सचिव सुधीर साळवी यांच्या हस्ते आणि मंडळाच्या संचालिका उर्मिला पांचाळ व सहसंचालक मुकेश कोळी, आनंद गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. यावेळी नाना फाटक, संतोष कांबळी, रूपेश कोचरेकर, नामदेव ओटवकर, सुशील डिचोलकर, प्रवीण वेंगुर्लेकर, रवींद्र कांदळकर, प्रफुल्ल गावकर, प्रणव डामरे उपस्थित होते.

Displaying ekata Vaibhav.jpg

शिवसेना शाखा क्रमांक 21 च्या वतीने एकतानगर नाका, स्टार लाईट बिल्डिंगजवळ भगवा ध्वजस्तंभ उभारण्यात आला. त्याच्या उद्घाटन समारंभाला विभागप्रमुख संतोष राणे, विभाग संघटिका मनाली चौकीदार तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन उपविभागप्रमुख श्याम मोरे, शाखाप्रमुख रवींद्र मर्ये, महिला शाखा संघटक दीपाली निकम यांनी केले.

Displaying arun d - vaibhav.jpg

प्रभाग क्रमांक 215 मधील बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना उपनेते, सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, मलबार हिल विधानसभा प्रमुख अरुंधती दुधवडकर, शाखाप्रमुख विजय पवार, शाखा संघटक सुप्रिया शेडेकर, युवासेना उपसचिव हेमंत दुधवडकर यांच्यासह उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिक उपस्थित होते.

Displaying borivali27 Vaibhav.jpg

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बोरिवली पश्चिम येथील शिवसेना शाखा क्र. 10 च्या वतीने एक्सर येथील ब्रह्मकुमारी गार्डनमध्ये वृक्षारोपण केले. यावेळी उपविभागप्रमुख विनायक सामंत, शाखाप्रमुख मिलिंद म्हात्रे, शाखा संघटक शिल्पा पितळे, शाखा समन्वयक सूर्यकांत निर्मळ, अश्विनी पाटील, ग्राहक संरक्षण कक्षाचे विनोद मोरे, युवासेनेचे गणेश म्हात्रे उपस्थित होते.

Displaying mulund27 27 - vaibhav.jpg

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित मुलुंड पूर्व येथील राजे संभाजी सभागृहात शेकडो गरजू विद्यार्थ्यांना वह्या आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी शिवसेना सचिव सुरज चव्हाण, विभागप्रमुख रमेश कोरगावकर, उपविभाग प्रमुख नितीन चवरे, विधानसभा संघटक व्यंकटेश अय्यर, शाखाप्रमुख संजय जाधव, अमोल संसारे, सामाजिक कार्यकर्ते अॅड. सागर देवरे, विद्यार्थी सेना मुलुंड संघटक यशवंत यादव, महिला आघाडी उपविभाग संघटक कविता शिर्पे, शाखा संघटक सायली सावंत, विधानसभा संघटक संचिता देठे उपस्थित होते.