
सामना ऑनलाईन । मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांसोबतच देशभरातून विविध पक्षाचे बडे नेते आणि कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उद्धव ठाकरे यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांना जनसेवेसाठी दीर्घ आणि निरामय आयुष्य लाभो, असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
Birthday wishes to Shri Uddhav Thackeray. May Almighty bless him with a long and healthy life in service of society.
— Narendra Modi (@narendramodi) July 27, 2018
त्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 27, 2018
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील आपल्या ट्विटर हँडलवरून उद्धव ठाकरे यांच्या निरामय आणि आनंदी आयुष्यासाठी इच्छा प्रगट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
Best wishes to Shri Uddhav Thackeray ji, on his birthday. I wish him good health and happiness always.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 27, 2018
बांगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील उद्धव ठाकरे यांना ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Wishing Uddhav Thackeray ji a very happy birthday
— Mamata Banerjee (@MamataOfficial) July 27, 2018
Summary: Shiv Sena party supremo Uddhav Thackeray receives birthday wish from PM Narendra Modi and other big leader.



























































