उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शेतकऱ्याला शिवसेनेने मिळवून दिली कर्जमुक्ती

873

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अहमदपूर दौऱ्यावर 5 नोव्हेंबर रोजी सुनेगाव येथे आले असता लिगंधाळ येथील शेतकरी सदाशिव राम पुरगुरले यांनी शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांची व्यथा मांडली होती. त्यांनी सांगितले होते की 2017 साली पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते माझा सपत्नीक सत्कार जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला होता. परंतु मी बँकेत खेटे मारुन थकलोय, आजपर्यंत माझी कर्जमाफी झाली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तत्काळ शिवसेना उपजिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांना आदेश देऊन चौकशी करून कर्जमुक्ती करून घेण्यास सांगितले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आज येथील लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्याला सोबत घेऊन शिवसैनिकांनी येथील फिल्ड ऑफिसर रामदास देशमुख यांना जाब विचारला. शासनाने कर्जमुक्ती देऊनही तुम्ही शेतकऱ्यांना त्रास देण्याच थांबवा अन्यथा शिवसेनेच्या वतीने शिवसेना स्टाईल आंदोलन करून न्याय मिळवून देवू म्हणून सांगताच अवघ्या दहा मिनिटात बँकेच्या वतीने फिल्ड ऑफिसर रामदास देशमुख, शाखा तपासणीस एन.जी. कांबळे यांनी शेतकरी सदाशिव राम पुलगुरले यांच्या नावाने 49000 कर्जमुक्तीचे पत्र दिले. यावेळी शेतकरी सदाशिव राम पुरगुरले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे व शिवसेनेचे आभार व्यक्त केले.

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अशा अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कर्जमुक्ती करून देण्यासाठी शिवसेना ठोस धोरणांचा अवलंब करून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला कर्जमुक्ती करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी सांगितले, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी शिवसैनिकांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, शहरप्रमुख भारत सांगवीकर, उपतालुका प्रमुख अनिकेत फुलारी, नगरसेवक संदिप चौधरी, लक्ष्मण अलगुले, शाखाप्रमुख लहू बारवाड, बालाजी काळे, सरपंच गंगाधर गुरमे, कैलास महाराज मद्दे, फिल्ड ऑफिसर रामदास देशमुख, शाखा तपासणीस एन.जी. कांबळे यांची उपस्थिती होती.
फोटो.

आपली प्रतिक्रिया द्या