महाविकास आघाडीचा चिराही ढासळणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

2370

भाजपकडून एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ सुरू होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, एप्रिल महिन्याची वाट कशाला बघता, आज, आत्ता तुम्ही महाविकास आघाडीचे सरकार पाडून दाखवा, असे खुले आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुक्ताईनगरमधील शेतकरी मेळाव्यात दिले. जनतेच्या आर्शिवादाने हे सरकार सत्तेत आले आहे. जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार काम करत आहे. जनता सरकारच्या पाठिशी ठामपणे उभी असल्याने महाविकास आघाडी सरकारचा चिराही ढासळणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असून सरकारला कोणताही धोका नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आमच्यात कोणतेही मतभेद नसून आम्ही जनतेच्या हिसासाठी काम करत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे भाजपने महाविकास आघाडीची काळजी करण्याऐवजी स्वतःच्या पक्षाची काळजी घ्यावी, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या