
राज्यातील सर्वात महत्त्वाची महापालिका असलेल्या ठाणे महापालिकेच्या महापौरपदी आज शिवसेनेचे नरेश म्हस्के यांची बिनविरोध निवड झाली, तर उपमहापौरपदी शिवसेनेच्याच पल्लवी कदम विराजमान झाल्या असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी आज नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. गेली 25 हून अधिक वर्षे सर्वसामान्य ठाणेकरांनी शिवसेनेला सत्ता दिली असून विकास हाच शहराचा अजेंडा असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
विद्यमान महापौर मीनाक्षी शिंदे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर नव्या महापौरांची निवड प्रक्रिया पार पडली. महापौरपदी नरेश म्हस्के यांची, तर उपमहापौर म्हणून पल्लवी कदम यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. सर्वसामान्य शिवसैनिकाची महापौरपदी निवड होताच फटाक्यांची आतषबाजी करत आपला आनंद व्यक्त केला. या निवडीसाठी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे हे आवर्जून उपस्थित होते. महापौरांच्या दालनात जाऊन त्यांनी महापौर नरेश म्हस्के व उपमहापौर पल्लवी कदम यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आजच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयात तसेच प्रवेशद्वाराबाहेरही शिवसैनिकांची प्रचंड गर्दी झाली होती. शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवकही उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांचे पालिकेत आगमन होताच शिवसेना झिंदाबादच्या घोषणेने परिसर दणाणून गेला.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, जितेंद्र आव्हाड, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी आमदार सुभाष भोईर, मावळत्या महापौर मीनाक्षी शिंदे, मावळते उपमहापौर रमाकांत मढवी, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के, माजी महापौर संजय मोरे, शहरप्रमुख रमेश वैती, उपशहरप्रमुख जगदीश थोरात, परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक, विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, युवासेनेचे पालघर विस्तारक राहुल लोंढे आदी उपस्थित होते.
रस्ते, पाणी, आरोग्य सेवा अधिक बळकट करणार!
शहराच्या किकासरथाचे सारथ्य माझ्याकडे आले आहे. पक्षाने माझ्याकर जो किश्कास दाखकला आहे तो सार्थ ठरकिण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार असून किकासरथाची घोडदौड यापुढेही कायम ठेकणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित महापौर नरेश म्हस्के यांनी दिली आहे. ते म्हणाले, रस्ते, पाणी, आरोग्य सेवा, शैक्षणिक सुविधा आदींना बळकटी देऊन सर्वसामान्यांचे जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी मी कटीबद्ध आहे. मेट्रोच्या जाळय़ाबरोबरच ठाणे व मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान नवे स्थानक उभारण्याच्या कामाला गती देणार आहे. महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱया 10 लाख नागरिकांच्या डोक्यावर असलेली टांगती तलवार क्लस्टरच्या माध्यमातून दूर करून त्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचेही म्हस्के यांनी स्पष्ट केले. ठाणे शहरात बीकेसीच्या धर्तीवर बिझनेस हब किंवा ग्रोथ सेंटर उभारणार असून उद्योगधंद्यांना चालना मिळवून देणार आहे. ठाण्यातील उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.
माजी महापौरांच्या तैलचित्र दालनाचे उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक
ठाण्यातील सर्व माजी महापौरांच्या तैलचित्रांचे स्वतंत्र दालन पालिकेत उभारण्यात आले आहे. प्रथम महापौर सतीश प्रधान ते मावळत्या महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यापर्यंत 21 महापौरांच्या छायाचित्र दालनाचे दोन दिवसांपूर्वीच उद्घाटन झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी या तैलचित्रांच्या दालनाला भेट देऊन विशेष कौतुक केले.
आनंदनगर झोपडपट्टी ते महापौर
ठाण्याचे प्रथम नागरिक म्हणून मान मिळालेले नरेश म्हस्के यांचा राजकीय प्रवास अतिशय खडतर झाला आहे. आनंदनगरमधील झोपडपट्टी भागात गेली 42 वर्षे दीडशे चौरस फुटांच्या घरात वास्तव्य केलेल्या म्हस्के यांनी किद्यार्थी सेनेचा कार्यकर्ता म्हणून आपल्या कामाला सुरुकात केली. वडिलांच्या अकाली निधनामुळे कोसळलेल्या दुःखाचा डोंगर.. शाळकरी वयातच खांद्यावर आलेली कुटुंबाची जबाबदारी.. लहान-मोठी नोकरी करत असतानाच त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. महाकिद्यालयीन कारकीर्दीत किद्यार्थ्यांच्या प्रश्नांकर रस्त्यांकर उतरून अनेक आंदोलने केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक असलेले नरेश म्हस्के शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुखही झाले भारतीय विद्यार्थी सेनेचा झेंडा मुंबई विद्यापीठावर फडकला तेव्हा 33 पैकी 22 ‘यूआर’ हे ठाणे जिह्यातील होते. या यशामध्ये म्हस्के यांचा मोलाचा वाटा होता. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक जबाबदाऱया यशस्वीपणे पार पाडल्या. महासभेत त्यांनी अतिशय आक्रमकपणे शिवसेनेची बाजू मांडून ठाणेकरांच्या प्रश्नांना वाचा फोडली. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या मुशीत वाढलेल्या म्हस्के यांनी ठाणे जिह्यात आपल्या संपर्कामुळे स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. 2002 पासून नगरसेकक म्हणून ते सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत आहेत. स्थायी समिती सभापती, सभागृहनेते ही पदेही त्यांनी भूषविली. शिवसेनेचे शहरप्रमुख ते जिल्हाप्रमुखपदापर्यंत त्यांनी संघटनेत काम केले.
सर्वांना विश्वासात घेऊन काम करू
ठाण्याच्या राजकारणात विकासाचा मुद्दा येतो तेव्हा सर्वपक्षीय नेते, नगरसेवक एकत्र येतात. गेली 25 वर्षे ठाणेकरांनी शिवसेनेला सत्ता दिली आहे. यापुढेही सर्वांना विश्वासात घेऊन विकासकामे करणार असून ठाण्याचा कायापालट करणारच. शहराचा विकास हाच शिवसेनेचा अजेंडा राहील.
– एकनाथ शिंदे, शिवसेना नेते.
मित्र महापौर झाला याचा मोठा आनंद
नरेश म्हस्के हे माझे जुने मित्र असून ते महापौर झाले याचा मोठा आनंद आहे. राजकारणाच्या पलीकडे मैत्री कशी टिकवावी याचा आदर्श शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी घालून दिला आहे. हा आदर्श डोळ्यांपुढे ठेवूनच आम्ही वाटचाल करत आहोत.
– जितेंद्र आव्हाड, आमदार.





























































