सावरकरांना न मानणाऱ्यांना भर चौकात फटकावले पाहिजे! उद्धव ठाकरे कडाडले

2637

दिल्ली विद्यापीठाच्या आवारामध्ये असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. काँग्रेसप्रणित विद्यार्थी संघटना NSUI ने ही विटंबना केली आहे. या घटनेबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जी लोकं सावरकरांना मानत नाही अशांना फटाकवेल पाहीजे असे संतप्त उद्गार त्यांनी काढले आहे. मुंबईमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे म्हटले आहे.

काँग्रेसची विनाशकाले विपरीत बुद्धी, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळय़ाची घोर विटंबना

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याची घोर विटंबना काँग्रेसप्रणित विद्यार्थी संघटना एनएसयुआयने केली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या आवारात गुरूवारी मध्यरात्री ही संतापजनक घटना घडली. या घटनेने विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण असून, सावरकरप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, काँग्रेसचे हे दृश्कृत्य म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असेच आहे.

या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की “जी लोकं सावरकरांना मानत नाहीत त्यांना एकदाच भर चौकात फटकावले पाहीजे,त्याच्याशिवाय त्यांना स्वातंत्र्यासाठी कोणी किती कष्ट घेतलेत याची कल्पना येणार नाही. सावरकरांचा अपमान जो राहुल गांधी यांनीही केला होता, ही जी अवलाद आहे त्यांना स्वातंत्र्याचे मोल कळणार नाही. “

आपली प्रतिक्रिया द्या