उद्धव ठाकरे यांचं शिर्डी विमानतळावर जंगी स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav-thackeray

शिवसेनेचे पक्षप्रमुख शुक्रवारी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून शिर्डी विमानतळावर शिवसैनिकांनी त्यांचे दणक्यात स्वागत केले. यावेळी जय भवानी जय शिवराय, शिवसेना झिंदाबाद, उद्धवसाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाबाजीने सारा परिसर दणाणून सोडला. यावेळी सौ. रश्मी उद्धव ठाकरे तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोनई या ठिकाणी ते माजी खासदार यशवंतराव गडाख यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर शनिशिंगणापूर या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शन घेणार आहेत व दुपारनंतर ते शिर्डी या ठिकाणी रवाना होऊन तेथे श्रीसाईबाबांचे दर्शन घेणार आहेत.

आज शिर्डी या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर पक्षाचे संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. बबनराव घोलप संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, माजी विश्वस्त सचिन कोते, सुहास वाढणे, गणेश सोमवंशी, नाना बावके, भागवत लांडगे आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.