
हिंदुस्थाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शिवसेना भवन येथे ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली.
यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते ॲड. अनिल परब, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, उपनेते आमदार सचिन अहिर, उपनेते मिलिंद वैद्य, शिवसेना सचिव सुधीर साळवी, शिवसेना सचिव ॲड. साईनाथ दुर्गे, माजी महापौर महादेव देवळे, उपनेत्या शितल शेठ-देवरुखकर, आमदार विभागप्रमुख महेश सावंत, शिवसेना प्रवक्ते हर्षल प्रधान, माजी महापौर विभागसंघटक श्रध्दा जाधव तसेच इतर पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते.
शिवसेना भवनाच्या प्रांगणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत, अनिल परब, सचिन अहीर आदि मान्यवर आणि शिवसैनिक उपस्थित होते. pic.twitter.com/yea2rdgnNH
— Saamana Online (@SaamanaOnline) August 15, 2025