
उदय जोशी, बीड
आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील बूथ प्रमुख, गट प्रमुख, शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 23 ऑक्टोबरमध्ये बीडला येत आहेत अशी माहिती जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुलूक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बीड जिल्ह्यातील लोकसभा, सहा विधानसभा स्वबळावर लढवण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार बूथ प्रमुख, गट प्रमुख नियुक्त केले आहेत. सहा विधानसभा मतदार संघात अडीच हजार बूथ प्रमुख नेमले आहेत. बूथ रचना आणी तांत्रिक बाबीसाठी शिवसेना सज्ज झाली आहे.
त्या अनुषंगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बीडमध्ये मार्गर्शन करणार आहेत या मेळाव्यात गट प्रमुख, बूथ प्रमुख, शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत, 23 ऑक्टोबर रोजी बीड मधील रामकृष्ण लॉन्स मध्ये सकाळी 11 वाजता हा मेळावा होणार आहे. या वेळी संपर्क नेते चंद्रकांत खैरे, विश्वनाथ नेरुरकर, संपर्क प्रमुख सुधीर मोरे, महिला आघाडी संघटक संपदा ताई गडकरी उपस्थतीत राहणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख सचिन मुलूक, कुंडलिक खांडे यांनी दिली आहे.
summary- uddhav thackeray will be in beed on 23rd october































































