
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहर शाखाप्रमुख व पदाधिकारी संवाद आज अण्णाभाऊ साठे सभागृह येथे संपन्न झाले. भविष्यातील निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, उपनेते पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर, उपनेते रघुनाथ कुचिक, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना प्रवक्ते व जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान, पुणे सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, शहरप्रमुख संजय मोरे आणि शहरप्रमुख गजानन थुरकुटे तसेच पुण्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


































































