नैराश्येतून आत्महत्येचा विचारही आला, 22 वर्षे धमक्या सहन केल्या – गायक उदित नारायण

6348

प्रख्यात गायक उदित नारायण यांनी इंडस्ट्रीत आज 40 वर्षे पूर्ण केली. यानिमित्ताने ते आपले युटय़ुब चॅनेल लाँच करत आहेत. चार दशकांच्या काळात दोन वेळा पद्म आणि पाचकेळा फिल्म फेअर अॅवाॅर्ड जिंकणाऱया उदित नारायण यांचा हा प्रवास सोपा नव्हता. 22 वर्षे धमक्या सहना केल्या, तसेच नैराश्येतून आत्महत्येचा विचारही मनात आला, अशी खळबळजनक माहिती त्यांनी दिली आहे.

उदित नारायण यांनी एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, मुंबईत काम मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. 1980 चा काळ असेल, सहा-सात जणांसोबत एक रुम शेअर वरून राहत होतो. टॅलेंट असूनही अनेक संगीतकारांचे उंबरठे झिजकावे लागले, तेव्हा कुठे पहिले काम मिळाले. मात्र ‘कयामत से कयामत’ नंतर मागे वळून बघितले नाही.

उदित नारायण पुढे म्हणाले, 1998 मध्ये ‘कुछ कुछ होता है’ यशस्की झाल्यानंतर खंडणीसाठी धमक्यांचे फोन येऊ लागले. माझ्यामुळे ज्यांना असुरक्षित वाटत होते, अशा एका ग्रुपने तर माझी सुपारीच दिली होती. त्यावेळी मुंबई क्राईम ब्रँचने माझी खूप मदत केली. दोन-चार महिने धमक्यांचे फोन येत होते. शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी सारं सहन केलं. बरं मी काही जास्त कमवत नव्हतो. एका गाण्याचे 15 ते 20 हजार रुपये मिळत होते. कोणाचं हिरावून घेत नव्हतो. तरीही मला त्रास देणं सुरूच होतं.

ध्येय मोठं, अडचणी जास्त

एकूणच मला त्रास द्यायचा प्रयत्न होता, जेणेकरून मी चांगलं गाणं गाऊ शकणार नाही. सुरुवातील मी खूप घाबरायचो, रडायचो. डिप्रेशनमध्ये गेलो. आत्महत्येचाही विचार मनात आला. जगणं सोपं नव्हतं माझ्यासाठी. संकटांचा सामना कधी लढून तर कधी मवाळ होऊन केला. पण संगीत रसिकांनी मला खूप प्रेम दिलं. जेवढं तुमचं ध्येय मोठं असेल, तेवढय़ा अडचणीही जास्त असतात, हे या 40 वर्षांच्या प्रकासाने शिकवलं, अशा भावना उदित नारायण यांनी व्यक्त केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या