
आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे राज्यव्यापी उद्योजक महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे यंदाचे 27 वे वर्ष असून ही परिषद रविवार, 2 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता दादर पूर्व हिंदू कॉलनी येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या बी. एन. वैद्य सभागृहात होणार आहे, अशी माहिती आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मीनल मोहाडीकर यांनी दिली.