विद्यापीठ, महाविद्यालयांतील लैंगिक शोषणाची माहिती द्या! यूजीसीने मागवली माहिती

सामना प्रतिनिधी ।  नवी दिल्ली

लैंगिक शोषण किती प्रकरणे नोंदवली गेली आणि त्यावर काय कारवाई केली, याची माहिती द्या, असे निर्देश केंद्रीय अनुदान आयोग (यूजीसी)ने देशातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना दिले आहेत. त्याचबरोबर लैंगिक शोषणाविरोधात स्थापन करण्यात आलेल्या अंतर्गत तपास समितीने (आयसीसी) आपला अहवाल सादर करावा, असेही निर्देश दिले आहेत.

लैंगिक शोषणाला आळा घालण्यासाठी यूजीसीने या आधी विद्यापीठांना अंतर्गत तपास समिती (आयसीसी) स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर यासाठी एक स्पेशल सेलची स्थापना करा, असेही म्हटले होते. समितीचा अहवाल 31 मार्चपर्यंत पाठवावा तसेच लैंगिक शोषणाविरोधात काय कारवाई केली, याची माहिती 31 जुलैपर्यंत द्यावा. ही सर्व माहिती सरकारला देण्यात येईल, असे यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी सांगितले.