यूजीसीच्या नव्या नियमांचा देशभरात तीव्र विरोध, आंदोलकांनी सवर्ण खासदारांना बांगडय़ा पाठवल्या

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नव्या नियमांविरोधात खुला प्रवर्ग आणि सवर्णांकडून देशभरात तीव्र विरोध करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशात निदर्शनात सहभागी होणाऱ्या नेत्यांनी सवर्ण खासदारांना बांगडय़ा पाठवल्या, तर नवे नियम मागे न घेतल्यास जगद्गुरू परमहंस आचार्य यांनी इच्छामृत्यूची मागणी केली आहे. तसेच बरेली येथील जिल्हा न्यायदंडाधिकारी अलंकार अग्निहोत्री यांनी नव्या नियमांच्या विरोधात राजीनामा दिला. नव्या नियमांना आव्हान देणारी याचिका विनीत जिंदाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार इत्यादी राज्यांत तीव्र निदर्शने करण्यात आली. रायबरेली येथे शेतकरी नेते रमेश बहादूर सिंह आणि गोरक्षा दलचे अध्यक्ष महेंद्र पांडेय यांनी सवर्ण खासदारांना बांगडय़ा पाठवल्या.