चेहरा वाईट असला म्हणून काय झालं…‘तो’ ठरला सर्वाधिक आवडता पक्षी

ज्याला 2004 साली जगातील सर्वात वाईट दिसणारा पक्षी असा किताब मिळाला होता तोच मपेट फेस्ड फ्रॉगमाऊथ हा पक्षी आज इन्स्टाग्रामवर सर्वांचा लाडका बनला आहे. विश्वास नाही बसणार पण या पक्ष्याला इन्स्टाग्रामवर 35 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

खरंतर या पक्ष्याचा चेहरा बेडकासारखा आहे, म्हणून फ्रॉगमाऊथ म्हणतात. नेचर ऑस्ट्रेलिया या संशोधन पत्रिकेने या पक्ष्याला 2004 साल जगातील सर्वात वाईट दिसणारा पक्षी ठरवले होते. मात्र इन्स्टाग्रामवर हाच पक्षी लोकांना सर्वाधिक आवडल्याचे आता दिसत आहे. संशोधकांना इन्स्टाग्रामवर 27 हजारहून अधिक वेगवेगळ्या प्रजातींच्या पक्ष्यांचे फोटो दिसले. या सर्व फोटोंना मिळालेल्या लाईक्सची तुलना करण्यात आली. त्यात प्रजातीच्या पक्ष्याचे फक्त 65 फोटो आढळले. या 65 फोटोंना 35 लाखांहून अधिक युजर्सने बघितल्याचे आणि लाईक केल्याचे दिसले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या