
आधार कार्डधारकांना लवकरच एक मोठा दिलासा मिळणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऍथोरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) एक नवीन मोबाईल ऑप्लिकेशन बनवण्याचे काम करत असून डिसेंबरच्या अखेरपर्यंत हे अॅप लाँच केले जाऊ शकते. हे अॅप लाँच झाल्यानंतर मोबाईलवरच आधार कार्डमधील नाव, पत्ता, जन्मतारीख आणि फोन नंबर अपडेट करण्याची सुविधा मिळणार आहे. ई-आधार अॅप हे ऑल इन वन डिजिटल इंटरफेस असेल. यामुळे आधार अपडेटसाठी आधार केंद्रावर वारंवार जाण्याची गरज राहणार नाही.