नीरव मोदीला ब्रिटनच्या हायकोर्टाचा झटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोट्यवधी रुपयांचा चुना लावून परदेशात पळून गेलेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीला ब्रिटनच्या हायकोर्टाने जोरदार झटका दिला आहे. कोर्टाने बँक ऑफ इंडिया संबंधित कर्जफेडीप्रकरणात करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे. नीरव मोदीने प्रकृती ठीक नसणे, दृष्टी कमी होणे आणि जेलच्या परिस्थिती सांगून सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती कोर्टाकडे केली होती. परंतु, कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली. या सुनावणीला नीरव मोदी हे उत्तर लंडनच्या पेंटनवील जेलमधून व्हिडीओ कॉलद्वारे उपस्थित राहिले. नीरव मोदी मार्च 2019 पासून ब्रिटनच्या जेलमध्ये बंद आहे. जामीन मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. परंतु, कोर्टाने अद्याप जामीन दिला नाही.