
ब्रिटनमध्ये एका शाळेत संतापजनकप्रकार समोर आला आहे. एका विद्यार्थ्याने मिलीट्री कट केल्याने शाळा प्रशासनाने त्याच्यासोबत भयंकर कृत्य केले. त्या विद्यार्थ्याला अंधाऱ्या खोलीत कोंडून शिक्षा दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
द सनच्या वृत्तानुसार, चार्ली (14) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. ब्रिटनच्या हल येथे राहणारा चार्ली किंग्सवुड अकादमी नावाच्या शाळेत शिकत होता. चार्लीने ईस्टर ब्रेक दरम्यान अनोख्या पद्धतीने केस कापून घेतले होते. त्याने डोक्याच्या दोन्ही बाजूचे केस काढले होते. फक्त त्याच्या डोक्यावरच केस होते. हिंदुस्थानात अशा पद्धतीच्या हेअरस्टाईलला मिलीट्री कट बोलले जाते. अशा हेअरस्टाईलसोबत विद्यार्थी शाळेत पोहोचला तर शाळा प्रशासनाने त्याला एका अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवले. त्यानंतर शाळा प्रशासनाने विद्यार्थ्याच्या आईला फोन केला की, चार्लीने कापलेले केस शाळेच्या नियंमामध्ये बसत नाहीत. या कारणामुळे त्याला अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवले आहे. शाळा प्रशासनाने पूढे तर्क लावत सांगितले की, त्याच्या केसांचे दोन रंग झाले. त्यामुळे दुसरे विद्यार्थीही भरकटतात. या कारणामुळे चार्लीला बंद खोलीत ठेवले होते. त्याला पूर्ण दिवसातून फक्त दोनदा टॉयलेटला जाण्याची परवानगी दिली होती.
शाळा प्रशासनाच्या या वागणूकीवर चार्लीची आई प्रचंड संतापली. त्याच्या आईने सांगितले की अशाप्रकारची शिक्षा देणं त्याच्या मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही. पुढे त्याची आई म्हणाली, शाळेला त्याला शिक्षा द्यायचीच होती तर त्याच्यावर कारवाई करायची. मुलाला अशाप्रकारे शिक्षा दिल्याने आई प्रचंड नाराज झाली आहे. आईने सांगितले मुलाच्या केसांचा कुठलाही रंग दिलेला नाही,. आता शाळा प्रशासनाने विद्यार्थ्याला शाळेत येण्यासाठी बंदी घातली आहे. शाळेच्या म्हणण्यानुसार चार्ली तेव्हाच शाळेत येऊ शकतो जेव्हा त्याच्या डोक्यावर पूर्ण केस येतील.




























































