सुमीमध्ये बॉम्बहल्ले, एक हजार हिंदुस्थानी विद्यार्थी अडकले… खायला अन्न नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियाने युद्धाच्या आठव्या दिवशी बॉम्ब आणि क्षेपणास्त्र्ा हल्ले वाढविले असून, युव्रेनची राजधानी कयीवसह खारकीव्हा, सुमी आदी शहरांमध्ये विध्वंस सुरु आहे. सुमीमध्ये अजूनही एक हजार हिंदुस्थानी विद्यार्थी अडकले आहे. त्यांच्या जवळचे अन्न संपले आहे. खायला काहीच नाही. लवकर आम्हाला येथून बाहेर काढा नाही तर भुकेनेच आम्ही मरू, अशी विनवणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

एका बंकरमध्ये या विद्यार्थ्यांनी आश्रय घेतला आहे. सुमी स्टेट युनिव्हर्सिटीत मेडिकलचे शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. बॉम्ब हल्ल्यांमुळे विद्यार्थ्यांना बाहेर पडता येत नाही. आठ दिवस पुरेल एवढेच पॅकफूड, फळे, बिस्कीट या विद्यार्थ्यांकडे होते. मात्र, आता अन्न संपले आहे. बाहेर दुकाने, मॉल, हॉस्पिटल बॉम्ब हल्ल्यात उद्ध्वस्त झाले आहेत.

रशियामार्गे आणणे सोपे
सुमी शहरापासून पोलंड, रोमानियाची सीमा 1200 ते 1400 कि.मी.वर आहे. त्यामुळ इतके अंतर पार करणे विद्यार्थ्यांना शक्य नाही. तिथपर्यंत जाण्यासाठी 12 ते 14 तास लागतात. मात्र, सुमीपासून रशियाची सीमा केवळ 50 ते 60 कि.मी.वर आहे. त्यामुळे रशियन सरकारशी बोलून आम्हाला सुरक्षित बाहेर काढा. आमचा जीव वाचवा, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेंद्र सरकारला केली आहे.