50 झोपडय़ा,20 स्टॉल, टपऱया, मासळी बाजारावर बुलडोझर

1405

गोल मैदान परिसरातील 40 हातगाडय़ांवर हातोडा मारल्यानंतर उल्हासनगर पालिकेने आज मिशन स्टेशन फत्ते कले. उल्हासनगर स्थानकातील फलाट क्रमांक एकला खेटून असलेल्या 50 झोपडय़ा, 20 स्टॉल, टपऱया आणि मासळी बाजारावर बुलडोझर फिरवून परिसर सफाचट केला. त्यामुळे स्थानक परिसराने मोकळा श्वास घेतला.
उल्हासनगर स्थानकाला खेटून असलेल्या बेकायदा बांधकामांमुळे आणि टपऱयांमुळे परिसराला बकाल स्वरूप आले होते. उशिरा का होईना पालिका आयुक्त सुधाकर देखमुख यांचे याकडे लक्ष गेले आणि त्यांनी धडक कारवाईला सुरुवात केली. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार उपायुक्त मदन सोंडे, सहायक आयुक्त गणेश शिंपी, अजित गोकारी, भगकान कुमाकत यांनी स्थानक परिसरात पालिकेच्या भूखंडाकर बेकायदेशीररित्या थाटण्यात आलेल्या 50 झोपडय़ा, 20 स्टॉल्स, 8 लोखंडी टपऱया, मासळी बाजार भुईसपाट केले.

आपली प्रतिक्रिया द्या