उमेश भोयर यांचा आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने सन्मान

काळाचौकी येथील एमपीएस अभ्युदय नगर हिंदी शाळेचे शिक्षक उमेश भोयर यांना आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वीर जिजाबाई भोसले उद्यान येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. अतिरिक्त पालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते उमेश भोयर यांचा सुवर्णपदक, ट्रॉफी, प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उपआयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी सुजाता खरे, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भोयर हे पालिकेच्या शिक्षण विभागात 17 वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते शिक्षक सेनेचे सरचिटणीस आहेत.