आत्याच्या नवऱ्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, बीड जिल्ह्यातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rape
प्रातिनिधिक फोटो

गेवराई तालुक्यातील पांगरी येथील रहिवाशी असलेल्या एका नराधमाने आपल्या अल्पवयीन भाचीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हा गुन्हा पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत घडला असून त्याचा तपास गेवराई पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आला आहे.

तेरा वर्षीय पीडित मुलगी आपल्या आत्याच्या घरी राहत होती. आत्याच्या नवऱ्याने पिंपळनेर येथील अज्ञात लॉजवर या मुलीसोबत अतिप्रसंग केला.

पिंपळनेर आणि गेवराई पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केल्यानंतर हा गुन्हा रात्री गेवराई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी बलात्कारासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरिक्षक ए.डी.भोसले या करत आहेत.