Under 19 cricket : हिंदुस्थानने पाकिस्तानला नमवले

840

श्रीलंकेत सुरु असलेल्या 19-वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत हिंदुस्थानने प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर दमदार विजय मिळवला. हिंदुस्थानी संघाने प्रथम फलंदाजी करत 305 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 245 धावांत आटोपला. या सामन्यात हिंदुस्थानने 60 धावांनी दमदार विजय मिळवला.

हिंदुस्थानी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हिंदुस्थानच्या अर्जुन आझाद आणि तिलक वर्मा यांनी दुसऱ्या गड्यासाठी 183 धावांची भागीदारी करत संघाची मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाचा वाटा उचलला. आझादने 11 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 121 धावा फटकावल्या. आझादला वर्माने चांगली साथ देत 10 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 110 धावा केल्या. हिंदुस्थानच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ सुरुवातीलाच ढेपाळला. पाकिस्तानी संघ अवघ्या 245 धावातच गारद झाला आणि हिंदुस्थानने 60 धावांनी विजय नोंदवला. या सामन्यात मुंबईकर फिरकीपटू अथर्व अंकोलेकरने सर्वाधिक तीन गडी बाद केले.

आपली प्रतिक्रिया द्या