‘टीम इंडिया’चा 29 चेंडूंत विजय, युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा

361

युवा विश्वचषक (19 वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी ‘टीम इंडिया’ आणि जपान यांच्यातील लढत अक्षरशः मांजर-उंदराच्या खेळासारखी ठरली. हिंदुस्थानने लिंबूटिंबू जपानचा 22.5 षटकांत केवळ 41 धावांत खुर्दा उडवला, तर 29 चेंडूंत एकही फलंदाज न गमवता विजयाची औपचारिकताही पूर्ण केली. 5 धावांत 4 बळी टिपणारा रवी बिष्णोई सामन्याचा मानकरी ठरला.

आपली प्रतिक्रिया द्या