भुयारी मेट्रोचे पहिले चार डबे मुंबईत दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुलाबा ते सीप्झ मेट्रो तीनचा पहिल्या ट्रेनचे चार डबे आंध्रप्रदेशातून मुंबईत दाखल झाले आहेत. तर उर्वरित चार डबे लवकरच दाखल होणार आहेत. या भुयारी रेल्वेचा पहिला टप्पा सीप्झ ते बीकेसी असा 2024 च्या तिमाहीत सुरू करण्याची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनची योजना असून त्याच्या चाचण्या घेण्यासाठी हे डब्बे आंध्रप्रदेशच्या श्रीसिटीमधून मुंबईत दाखल होत आहेत.

आठ डब्यांच्या या अ‍ॅक्वा रंगाच्या प्रोटोटाईप ट्रेनची मरोळ-मरोशी येथे चाचणी होणार आहे. पहिली भुयारी मेट्रो ट्रेन ‘मेक इन इंडिया’अंतर्गत तयार करण्यात आली असून आंध्रातील फ्रोन्सच्या अल्स्टॉम ट्रेन मॅन्युफॅक्चुरींग प्लांटमध्ये हे कोच तयार केले जात आहेत.

पहिल्या ट्रेनचे चार डबे मुंबई मरोळ-मरोशी येथे दाखल झाले असून येथे प्रोटोटाईप रेकसाठी तात्पुरता रॅम्प तयार करण्याचेही काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.