
भुयारी मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्ग-3 साठी आठ डब्यांची पहिली प्रोटोटाईप ट्रेन अखेर चाचण्यांसाठी सुसज्ज असून या ट्रेनच्या सारीतूत नगर ते मरोळ मरोशी येथे येत्या 15 ऑगस्ट रोजी चाचण्या घेण्यात येणार आहे. या ट्रेनला बॅटरीवर चालणार्या शन्टरने रूळांवर आज एकत्र आणून जोडण्यात आले आहे.
या अल्स्टॉम कंपनीच्या ट्रेनचे डब्बे आंधप्रदेशातून दोन दिवसांपूवी मुंबईत आणण्यात आले आहे. त्यांना आज बॅटरी ऑपरेटेड शन्टरद्वारे जोडण्यात आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने कार डेपोसाठी ही छोटी शन्टर मशिन खरेदी केले आहे. या छोट्या अद्भूत शन्टरची क्षमता 350 टन वजन खेचण्याची आहे.
बॅटरी पूर्णपणे चार्ज असताना हे शन्टर 8 डब्यांची ट्रेन 9 कि.मी.पर्यंत खेचू शकते. तसेच हे शन्टर सतत 50 किलो न्यूटन क्षमतेने काम करू शकते. या शन्टरची त्याच्या स्वयंचलित कप्लर तसेच अर्धस्थायी कप्लर अडॉप्टरसह यशस्वीरीत्या चाचणी करण्यात आली.
दोन्ही कप्लर मेट्रो डबे जोडण्यासाठी वापरले जातात. ठाणे येथील मे. रेनमॅक इंडिया प्रा.लि. यांनी नेदरलँड्सच्या एनआयटीइक्यू संस्थेसोबत तंत्रज्ञान हस्तांतरण करारांतर्गत ‘मेक इन इंडिया’ योजनेंतर्गत या रेल कम रोड शन्टरची निर्मिती करण्यात आली आहे.

























































