बापरे! पाण्यात 50 किलो वजन उचलून ‘बेंच प्रेस’, अनोख्या व्यायामाची गिनीज बुकात नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जे लोक आपल्या फिटनेसवर खूप लक्ष देतात त्यांना जिममध्ये गेल्यावर ‘बेंच प्रेस’सारखे वर्कआऊट करावे लागतात. भरभक्कम वजन उचलण्याचा हा व्यायाम कुणी पाण्यात केला तर… खरं वाटत नाही ना… पाण्यात ‘बेंच प्रेस’ करणाऱया अशाच एका फिटनेसप्रेमीने साऱया जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

रशियाचे विटेली विवचर त्यांनी गिनीज बुक रेकॉर्ड केला आहे. विटेली विवचर यांनी पाण्यात 50 किलो वजन उचलून 77 बेंच प्रेस केले. ही अद्भुत करामत म्हणावी लागेल. अचंबित करणारी बाब म्हणजे आपला टास्क पूर्ण करेपर्यंत त्यांनी आपला श्वास रोखून धरला होता. हा व्हिडियो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या यू-टय़ूबवर शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे हा व्हिडियो जोरात चर्चेत आलाय.