
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
बेरोजगारीने निराश झालेल्या तरुणांकडून बलात्कारासारखी कृत्य घडत असल्याचं वक्तव्य भाजपच्या हरयाणातील उचना कलान येथील आमदार प्रेमलता सिंग यांनी केलं आहे. हरयाणातील रेवाडी येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावर त्यांनी हे विधान केलं आहे.
रोजगार नसल्याने निराश झालेल्या तरुणांकडून बलात्कारासारखे गंभीर गुन्हे घडतात, असं प्रेमलता यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. त्यामुळे दरवर्षी २ कोटी रोजगार देऊ या पंतप्रधानांच्या आश्वासनाचं पितळ उघडं पडलं आहे.
दरम्यान, रेवाडी प्रकरणातील वैद्यकीय तपासणी अहवाल आला असून त्यातून पीडितेवर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी कोणाला काही माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हे प्रकरण सोडवण्यासाठी मदत करणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करत असल्याची घोषणा पोलीस अधीक्षक नाझनीन भसीन यांनी केली आहे.
summary- unemployed youth commit rapes says bjp mla premlata






















































