नवाब मलिकांचा मुलगा ईडीच्या रडारवर? युनियन बँक कर्ज प्रकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारी पाहुण्यांच्या स्वागतासाठी आपण चहा बिस्कीटसह तयार आहोत, अस ट्विट करत केंद्रीय तपास यंत्रणाचा मोर्चा आपल्याकडे वळल्याचे संकेत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिले होते. प्रत्यक्षात ईडीने आपला मोर्चा मलिक यांचा मुलाकडे वळवला असून युनियन बँक कर्ज प्रकरणात फराज मलिक यांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिल्लीहून आलेल्या ‘ईडी’च्या 40 अधिकाऱयांच्या पथकाने सोमकारी मुंबईत तब्बल सात ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये फराज मलिक यांच्याशी संबंधित असोसिएट हाय प्रेशर टेक्नॉलॉजी कंपनीचा समाकेश असल्याचे समजते. या कंपनीने युनियन बँकेकडून कर्ज घेतले होते, मात्र कर्जीतील जकळपास 10 कोटींची रक्कम फराज मलिक यांच्याशी संबंधित कंपन्यांकडे कळकण्यात आल्याचा आरोप आहे.असोसिएट हाय प्रेशर टेक्नॉलॉजीकडून नफा मिळकण्यासाठी हे पैसे चुकीच्या पद्धतीने इतर कंपन्यांमध्ये कळकण्यात आले. यामुळे युनियन बँक ऑफ इंडियाचे तब्बल 149.89 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार बँक प्रशासनाकडून करण्यात आली आहे.