टॅक्सीचे किमान भाडे 30 रुपये करा, टॅक्सीमेन्स युनियनची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने दीड किलोमीटरमागे 22 रुपयांऐवजी किमान 30 रुपये करावेत अशी मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने परिवहन विभागाकडे केली आहे. याबाबतचे पत्र परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना पाठवले असून भाडेवाढ न मिळाल्यास संपाचाही इशारा दिला आहे. यासाठी पंधरा दिवसांची नोटीसही देण्यात आल्याचे संघटनेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

वाढत्या महागाई निर्देशांकानुसार टॅक्सी चालकांना कुटुंब चालविताना अवघड होत असून गेल्या तीन वर्षांत टॅक्सीच्या भाडय़ात वाढ झालेली नाही. भाडेवाढ करावी अन्यथा संपाशिवाय पर्याय नसल्याचे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वाड्रोस यांनी म्हटले आहे.